मोठी बातमी!! उद्धव ठाकरे गटाला पुन्हा पक्ष अन् धन्यष्यबाण मिळणार? आज सर्वोच्च सुनावणी…


नवी दिल्ली : गेल्या वर्षी राज्यात मोठं राजकारण झालं. उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि आमदार एकनाथ शिंदे यांनी यावर दावा केला. यामुळे याबाबत कोर्टात सुनावणी सुरू आहे. याबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेंना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं जावू नये यासाठी ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

आता ठाकरे गटाने शिंदे गटाला निवडणूक आयोगाने दिलेले धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं, अशी मागणी केली आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ‘शिवसेना’ हे नाव, निवडणूक चिन्ह म्हणून ‘धनुष्यबाण’ आणि वाघासह पुन्हा भगवा ध्वज वापरण्याची परवानगी द्यावी अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना देताना निवडणुक आयोगाने न्यायालयप्रविष्ठ असे लिहिण्याचे निर्देश दिले होते. त्या धर्तीवर शिवसेना चिन्हाबाबत देखील निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. यामुळे येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे अडचणीत येऊ शकतात.

आता शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हावर आज न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाला चिन्ह आणि नाव वापरण्यास मनाई करा. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात दिलेल्या अंतरिम आदेशाप्रमाणे शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत अंतरिम आदेश द्या, असं ठाकरे गटाचे म्हणणे आहे.

आजची सुनावणी केवळ याचिकेवरील प्राथमिक निर्णयासाठी असली तरी, यावर बरच गणित अवलंबून आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटासह शिवसेनेविरुद्ध बंड केले. पक्ष फुटल्यानंतर निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि त्यांचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे दोन्ही एकनाथ शिंदे गटाला दिले. यामुळे उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!