पाटसमध्ये मस्तानी तलावात पोहोताना तरुण बेपत्ता, पोहायला शिकताना घडली घटना…


दौंड : पाटस येथील मस्तानी तलावात पोहायला गेलेला युवक बेपत्ता झाला असून सहा तासांपासून स्थानिक ग्रामस्थांची शोध मोहीम सुरू आहे. यामुळे सध्या उन्हाळ्यात पाण्यात उतरताना काळजी घेणे गरजेचे आहे.

शाहीद अन्सारी असे या युवकाचे नाव आहे. पुणे सोलापूर महामार्ग लगत असलेल्या मस्तानी तलावात हॉटेल आदिती येथील टायर पंचर काढणाऱ्या व्यवसायांची दोन तरुण हे मस्तानी तलावात पोहायला शिकण्यासाठी टायरची ट्युब घेऊन पाहण्यासाठी उतरले होते.

असे असताना मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. तलावात काही अंतरावर गेल्यावर दोघेही ट्युबवरून पाण्यात पडले. यामधील एका तरुणाला थोडेफार पोहता येत असल्याने तो पोहत बाहेर आला.

त्याचा जोडीदार हा मात्र पाण्यात पडला. याबाबतची माहिती ग्रामस्थांना समजल्याने ग्रामस्थांनी व‌ युवकांनी तत्काळ तलावात उडी टाकून त्याचा शोध घेतला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!