ओबीसी आरक्षणाच्या चिंतेतून तरुणाची आत्महत्या ; डोळ्यात पाणी आणणारी सुसाईड नोट… मी भरत कराड….

पुणे : गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मोठा वाद सुरु आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटिअरची अंमलबजावणी करण्यासाठी मान्यता दिली. तसेच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी देखील मान्य केली आहे. या मागणीमुळे ओबीसींचे असलेले आरक्षण संपुष्टात येईल या भीतीमुळे लातूरमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. या शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक पत्र लिहिले आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुसाईड नोटमध्ये काय?
भरत कराड यांनी मृत्यूपूर्वी एक पत्र चिठ्ठी लिहिली आहे. यामध्ये त्यांनी, मी भरत महादेव कराडे आताच महाराष्ट्र सरकारने समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसींचे कायमस्वरुपी आरक्षण संपवले आहे. मी वेळोवेळी ओबीसी बचाव आंदोलनात सहभाग घेतला होता. तरीही सरकारने ओबीसी समाजाचा घात करुन ओबीसी विरोधी जीआर काढल्यामुळे मी जीवन कायमस्वरुपी संपवत आहे. माझ्या पाठीमागे तरी माझ्या कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा असे म्हटले आहे.

ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल या चिंतेतून आत्महत्या केलेले भरत कराड हे फार शिकलेले नव्हते. त्यांनी मुलांच्या वहितील कागद फाडून त्यावर पेनाने लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. आता या आत्महत्येनंतर ओबीसी समाज आक्रमक झाला असून नवीन वादाला तोंड फुटले आहे.
