धाकट्या भावाला दारुचा नाद, घरात सतत भांडण; मोठ्या भावाने रागाच्या भरात आईबापासमोर…,पुण्यातील घटनेने खळबळ


पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

सतत मद्यपान करून कुटुंबाला त्रास देणाऱ्या लहान भावाचा मोठ्या भावाने चाकूने वार करून खून केला. बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अप्पर इंदिरानगर येथे सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण ऊर्फ ऋतिक दत्तात्रय नवले असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अनिकेत नवले (वय २६) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, प्रवीण कामधंदा करीत नव्हता. तो रोज मद्यपान करून घरात सतत भांडण करीत असे. रविवारी रात्री त्याने घरात गोंधळ घातला, त्यामुळे अनिकेतची पत्नी मुलीला घेऊन माहेरी गेली होती.

सोमवारी सकाळी त्यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. या वेळी घरात आई-वडीलही उपस्थित होते. वाद विकोपाला गेल्यानंतर अनिकेतने घरातील चाकू उचलून प्रवीणच्या पोटावर वार केले. त्यामुळे प्रवीण जागीच कोसळला. घरातील आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले.

त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा अनिकेत घरातच डोक्यावर हात ठेवून सुन्न अवस्थेत बसला होता. पोलिसांनी प्रवीणचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवून अनिकेतला ताब्यात घेतले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!