तू तरी झोप, नाहीतर जावेला पाठव, 19 वर्षीय नराधमाची 36 वर्षीय महिलेकडे मागणी, नकार दिल्यावर केले वार, पडले 280 टाके…

छत्रपती संभाजीनगर : भावकीतील 36 वर्षांच्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या 19 वर्षांच्या तरुणाने नकारानंतर तिच्या अंगावरती कटरने वार केले. त्यामुळे तिला तब्बल 280 टाके घालावे लागले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
घटना करून आरोपी गावात निवांत फिरत होता. ही घटना इतकी भयानक आहे की, सव्वादोन फुटांचा एक वार तर मानेपासून मांडीच्या खालपर्यंत आहे. ही धक्कादायक घटना रविवारी घडली होती. सध्या ही महिला एका रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. अभिषेक तात्याराव नवपुते असे या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप नव्हता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर विवाहितेने आरडाओरडा केला. नंतर आरोपीने तिच्यावरती वार केले आहेत. यामुळे त्या गंभीर जखमी झाले. तिचा चेहराही विद्रूप करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, माझ्यावर त्यानं इतके वार केले आहेत की, डॉक्टरला गोधडीवानी माझं अंग शिवावे लागले. हे टाके शिवण्यासाठी नुसता दोराच 22 हजार रुपयांचा लागला आहे. एकही अवयव असा नाहीये की जिथे फाडलेलं नाही. त्या घावांमुळे सगळ्या अंगातच आगडोंब उठला आहे, असं पीडितेने सांगितले आहे.
याबाबत माहिती अशी की, महिला शेतात काम करत असताना अभिषेकचा मला फोन आला. तो म्हणाला की, एक तर तू माझ्याबरोबर झोप, नाही तर तुझ्या जावेशीसोबत माझे जुळवून दे. महिलेनं फोन कट केला, या रागातून त्याने हे मृत्य केले असल्याचे सांगितले जात आहे.