घायवळ शस्त्र परवाना प्रकरणात योगेश कदमांच्या अडचणी वाढल्या ; पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी 2 तास ताटकळत बसण्याची वेळ? शिंदेंनी काय दिला सल्ला


पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ यांचा भाऊ सचिन घायवळ याच्या शस्त्र परवाना प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम चांगलेच अडचणीत आले आहेत.त्यांच्या सहीनंतरच सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मिळाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात अडचणीत सापडलेले योगेश कदम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेले होते.मात्र त्यांना तब्बल दोन तास मुक्तागिरी बंगल्यावर ताटकळत बसून रहावं लागलं, त्यानंतर एकनाथ शिंदे आणि कदम यांची भेट झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्तागिरी बंगल्यावर योगेश कदम हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते, मात्र त्यांना तब्बल दोन तास मुक्तागिरी बंगल्यावर ताटकळत बसून रहावं लागलं, त्यानंतर एकनाथ शिंदे आणि कदम यांची भेट झाली. कदम यांच्यावरील आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचा पक्षातील नेत्यांमध्ये सूर असल्याची देखील माहिती समोर येत आहे.
यावरून आता विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकेली झोड उठवली आहे. मात्र आता खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मोठा दिलासा देत सल्ला दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे योगेश कदम यांच्या पाठीशी आहेत. चुकीचं केलं नसेल तर घाबरायचं कारण नाही, विरोधकांच्या टीकेला जशास तसं उत्तर द्या, असं एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांंना सांगितल्याची माहिती मिळत आहे.

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणानंतर आपली भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे आणि योगेश कदम यांच्यात जेवण करता -करता चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 40 मिनिंट चर्चा झाली आहे. जर चुकीचं काही केल नसेल तर घाबरू नका, विरोधकांना जशास तसं उत्तर द्या, अशा सूचना यावेळी शिंदे यांनी कदम यांना दिल्या.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!