Yavat : यवत जवळील भांडगाव येथील कंपनीत विषारी वायू गळती, एकाचा मृत्यू, ८ जण गंभीर, घटनेने उडाली खळबळ…
Yavat : ऍसिडचे ड्रम पडून लागलेली आग विजवण्यासाठी अग्निबंबाचा वापर केल्याने विषारी वायू तयार झाल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
ही धक्कादायक घटना भांडगाव (ता. दौंड) येथील ‘वेस्टन मेटल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीत गुरुवारी (ता.२८) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
अमोल सूरज चौधरी (वय. २८, रा.खोर, ता. दौंड) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर इतर ८ जखमींची नावे अद्याप समजलेली नाहीत.
मिळालेल्या माहिती नुसार, कंपनीत काम करताना कामगारांना ऍसिड लागत असल्याने त्यांनी ड्रम फोडले होते. मात्र हे ड्रम अचानक पलटी झाले. हे ड्रम पलटी झाल्याने कंपनीत अचानक आग लागली. हि आग विझविण्यासाठी कामगारांनी तातडीने अग्निबंबाचा वापर केला. आणि तब्बल अडीज तासाच्या प्रयत्नानंतर हि आग विझविण्यात यश आले. Yavat
९ कामगारांना श्वसनाच्या त्रास…
या आगीच्या दरम्यान प्रचंड मोठ्या प्रमाणात विषारी धूर तयार झाला होता. हा धूर कामगारांच्या नाकातोंडात गेला होता. त्यावेळी कामगारांना कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही.
मात्र संध्याकाळी कामगार घरी गेल्यानंतर ९ कामगारांना श्वसनाच्या त्रास होऊ लागला. यातील अमोल चौधरी याचा मृत्यू झाला आहे. तर ४ कामगार अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तर चार कामगार सुस्थितीत असल्याची माहिती मिळत आहे.