Yashwant Factory : यशवंत कारखान्यासाठी उद्या निर्णायक मतदान! आक्रमक प्रचाराने निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष..!!


Yashwant Factory  उरुळीकांचन : वैयक्तीक हल्ले, आरोप – प्रत्यारोपांनी जिल्ह्यात चर्चेची राळ उठलेल्या थेऊर (ता.हवेली ) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उद्या शनिवार ( दि.९) रोजी मतदान पार पडत आहे. तब्बल १३ वर्षे बंद अवस्थेत असलेल्या या कारखान्यासाठी उद्या मतदान होत असल्याने मतदानावरून सभासदांत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

अर्थिक अनियमितता व अनागोंदी कारभारामुळे १३ वर्षापुर्वी हा कारखाना गाळपा अभावी बंद आहे. १३ वर्षे कारखान्यावर प्रशासकीय राजवट कायम राहून हा कारखाना शासन मदतीने पूर्वपदावर येऊ शकला नाही. गेली १३ वर्षे प्रत्येक राज्य सरकार व राज्यकर्त्यांनी निवडणूकीत यशवंत सुरू करु असा शब्द देऊन पोकळ अश्वासन देऊ केली आहे. मात्र १३ वर्षे कारखान्यासाठी ना कोणते नेते , ना राज्य शासन मदतीसाठी धावून न आल्याने सभासदांना न्यायालयात जाऊन कारखाना भवितव्यासाठी निवडणुकीचा मार्ग अवलंब करावा लागला आहे. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयात अथक लढ्यानंतर तब्बल १५ वर्षानंतर या कारखान्याची निवडणूक होत आहे.

कारखान्याच्या निवडणूकीसाठी ५५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले असून निवडणूकीसाठी तालुक्यातील सर्वपक्षीय राजकारण्यांचे दोन गट समोरासमोर आले आहेत. कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर,बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश म्हस्के , माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन यांच्या नेतृत्वाखाली आण्णा साहेब मगर रयत सहकार पँनेल व हवेली बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक प्रकाश जगताप, बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल निवडणूक लढवित आहे. तर इतर १३ उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभे आहेत.

कारखान्यासाठी शनिवार( दि. ८) रोजी ४२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण २१,०१९ मतदार हे मतदानासाठी पात्र आहेत. त्यासाठी राज्य सरकार प्राधिकरणाने २५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शितल पाटील,सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीकांत श्रीकांदे व हर्षित तावरे हे काम सांभाळत आहेत. मतमोजणी ही रविवार (दि.१०) रोजी उरुळीकांचन येथे पार पडणार असल्याने निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून असणार आहे.

फराळ व काही नोटांवर भागविले…!

बंद कारखान्यासाठी १५ वर्षानंतर निवडणूक होऊ घातल्याने बाजार समितीच्या निवडणूकीप्रमाणे यशवंत कारखान्यातही काही हौसे -नवश्यांची अपेक्षा जागृत झाली होती. संस्थेचे पुढील भविष्य या नवीन संचालक मंडळाच्या हाती येणार असल्यानेकारखानाच्या भविष्यतव्या दृष्टीने मतदारांनी अचूक व्यक्तींची निवड करणे क्रमप्राप्त असताना काही असंतुष्टांची’अर्थिक’ कामना जागृत झाली होती. मात्र उमेदवारही प्रसंग दडविण्यात तरबेज असल्याने काहींनी महाशिवरात्री फराळ तर काहींनी ठरावीक नोटांची ओवाळणी फिरवून अशांचे थोडक्यात भागविल्याची चर्चा रंगली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!