Yashwant Factory : हवेलीत ‘यशवंत’ कारखान्यासाठी ५४.४६ % इतके मतदान! उद्याच्या निकालाकडे जिल्ह्याचा नजरा खिळू़न ..!!


Yashwant Factory उरुळीकांचन : यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणूकीसाठी शनिवार (दि.९) रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४२ मतदान केंद्रांवर ५४.४६ % इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. कारखान्याच्या २१,४१९ मतदारांपैकी ११,६५५मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळी ९वाजता सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेत दुपारी१२ वाजेपर्यंत मतदारांनी प्रतिसाद दाखवत आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे.

यशवंत कारखान्याच्या निवडणूकीसाठी लोणी काळभोर, उरुळी कांचन आणि केसनंद या तीन मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली . उरुळीकांचन येथील मतदान केंद्रावर ऊस उत्पादक गट क्रमांक १ उरुळीकांचन, तर ऊस उत्पादक गट क्र. २ सोरतापवाडी या गटांचे मतदान आहे. तर लोणी काळभोर येथे ऊस उत्पादक गट क्र.३ लोणीकाळभोर, मांजरी-फुरसुंगी गट क्र. ४ अशी मतदान प्रक्रियेची व्यवस्था ठेवली होती. तर केसनंद येथे गट क्र. ५ लोहगाव- केसनंद व गट क्र. ६ वाडेबोल्हाई अशी मतदानाची व्यवस्था केली होती.

कारखान्यासाठी हवेली तालुक्यासह पुणे शहर, दौंड तालुक्यातील सभासद असल्याने मतदारांना गटनिहाय मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला लागत होता. त्यामुळे पुणे शहर व पिंपरी चिंचवड पट्यातील मतदारांनी मतदानास येण्यास फारसा उत्साह न दाखविल्याने मतदानाची संख्या रोडावली आहे. तर ऊस पट्यातील गटातील सभासदांनी मात्र बहुसंख्येने आपला हक्क बजावला आहे. उरुळीकांचन केंद्रावर १०४ वर्षे वयोवृद्ध असलेल्या विनायक धोंडीबा कुंजीर, शिंदवणे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान १५ वर्षानंतर कारखान्याची निवडणूक लागल्याने हवेली, दौंड तालुक्यातील मतदारांत मोठा उत्साह जाणवत होता. प्रचारात दोन्ही पॅनेलकडून एकमेकांविरोधात आरोपांच्या फैरी झडल्याने निवडणूकीत प्रचाराचे वातावरण चांगलेच तापले होते. एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर जहरी टिका व भ्रष्टाचाराचे मुद्दे बाहेर निघाल्याने प्रचाराला धार चांगलीच चढली होती. त्यामुळे मतदान प्रक्रियेची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र ऊस उत्पादक सभासद वगळता बिगर उत्पादक सभासदांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याने मतदानाची टक्केवारी घसरली. दरम्यान १३ वर्षे बंद असलेला परंतु कारखान्याची सत्ता मिळावी म्हणून हवेली बाजार समितीत कार्यरत असलेल्या संचाल क मंडळाच्या द़ोन गटांत कारखाना निवडणूकीचा ठिणगी पडली. Yashwant Factory

त्यामुळे कारखाना ताब्यात घेण्यासाठी हवेली तालुक्यात नवीन राजकीय समीकरणे या निवडणुकीत उदयाला आली आहेत. बाजार समितीत तयार झालेला सर्वपक्षीय गट पुन्हा विभक्त झाला आहे. तर पारंपरीक विरोधक ‘कालचा शत्रू आजचा मित्र’ म्हणी प्रमाणे एकत्र झाला आहे. दरम्यान मतदानानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता उरुळीकांचन येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे जिल्ह्याचा नजरा खिळून बसल्या आहेत. साधारण दुपारी १ नंतर गट निहाय निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

टिळेकरवाडी, खामगाटेकची अशीही वज्रमूठ!

कारखान्याच्या निवडणूकीच्या निमित्ताने टिळेकरवाडी, खामगाटेक या दोन गावांची एकची वज्रमूठ मतदान प्रक्रियेत दिसून आली. संपूर्ण दोन गावांतील मतदान स्त्री, पुरुष एकत्र येऊन एकसाथ त्यांनी पदयात्रा काढून अनोख्या एकजुटीचे दर्शन त्यांनी घडविले, फेटे घालून हे मतदार केंद्रावर पोहचल्याने या गावांच्या सामुहिक एकतेची वज्रमूठ पाहायला मिळाली.

गट निहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे :

ऊस उत्पादक गट उरुळीकांचन १८३७ सोरतापवाडी १८९० लोणीकाळभोर १८५८ फुरसुंगी १४३१ लोहगाव -केसनंद २१६३ वाडेबोल्हाई -२२३८ बिगर उत्पादन , उत्पादक संस्था, पणन संस्था ‘ब’ वर्ग २३८ एकूण -११,६५५ टक्केवारी ५४.४६%

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!