X New feature : आता ट्विटवर म्हणजेच एक्सवर सुध्दा करता येणार व्हिडिओ कॉल, नेमकं कसं जाणून घ्या…


X New feature : टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क हे जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. तसेच ते त्यांच्या नवनवीन आयडियांसाठी ओळखले जातात. ते सोशल मीडियावरही बरेच ॲक्टिव्ह असतात आणि लोकांपर्यंत अनेक गोष्टी पोहोचवत असतात.

तसेच सोशल मीडिया ॲप एक्स (ट्विटर) खरेदी केल्यापासून एलॉन मस्क यांनी त्यात अनेक बदल केले. तर आता ते एक्स (ट्विटर) वर आणखीन एक मोठा बदल करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

एलॉन मस्क एक नवीन फिचर सादर करत आहे; जे अँड्रॉइड वापरकर्त्यांना एक्स (ट्विटर) ॲपवरून थेट ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल करण्याची परवानगी दिली जाणार आहे. अँड्रॉइड वापरकर्ते ॲप अपडेटद्वारे या फीचर्सचा लाभ घेऊ शकणार आहेत. X New feature

हे युजर्सच फक्त प्रीमियम फिचर वापरु शकणार…

नव्या ऑडिओ-व्हिडिओ फिचरचा फायदा फक्त एक्स प्रीमियम युजर्सना घेता येणार आहे. फ्री युजर्संना हा पर्याय मिळणार नाही. कंपनीने यापूर्वीच अनेक फिचर्स प्रीमियम युजर्ससाठी मर्यादित केले आहेत.

सध्या तरी हे फिचर सर्व पेड युजर्ससाठी उपलब्ध असेल की केवळ प्रीमियम आणि प्रीमियम प्लस युजर्सपुरतेच मर्यादित आहे, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

कसे चालू करावे फिचर?

व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलचा पर्याय ऑन करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन प्रायव्हसी आणि सेफ्टीच्या पर्यायावर येऊन येथे डायरेक्ट मेसेजवर क्लिक करून ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलचा पर्याय ऑन करावा लागेल. असे केल्याने तुम्हाला चॅटमध्ये हा पर्याय दिसेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!