साडी ‘ब्लंडर्स’पासून स्वतःला वाचवा !


उरुळी कांचन : घरचा एखादा कार्यक्रम असो किंवा कॉलेज, ऑफिसमधली पार्टी या सर्व ठिकाणी साडी एकदम फिट बसू शकते. त्यामुळे आजही साडी तेवढीच ग्लॅमरस समजली जाते जेवढी ती पूर्वी समजली जात असे. आज डिझाईनर साड्यांची फॅशन खूप जोरात आहे. मात्र या सर्व ठिकाणी जर तुम्ही साडी नीट कॅरी केली नाही तर मात्र एक छोटीशी चूक सुध्दा तुमचा लूक बिघडावयाला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे साडी नेसताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेण्यास विसरू नका.

• साडी आणि साडीला मॅचिंग अशी शक्यतो ज्वेलरी निवडा. तुमच्याकडे साडीला मॅचिंग अशी खूप ज्वेलरी असली तरी सर्वच्या सर्व ज्वेलरी साडीवर घालू नका. त्यामुळे तुमचा लूक चांगला दिसण्याऐवजी बिघडू शकतो.

• साडी नेसण्याची आजच्या मुलींना फारशी सवय नसते तेव्हा जर तुम्हाला सवय असेल तर हाय हिल्स घाला अन्यथा फ्लॅट हिलला पसंती द्या.

• अनेकदा पायातल्या चप्पलपासून तुमच्या पर्सपर्यंत आणि टिकलीपासून ते ज्वेलरीपर्यंत सर्व मॅचिंग असणं जरूरीचं नाही. यामुळे तुमचं हसं होऊ शकतं. काही ठिकाणी जरूर मॅचिंग असू द्या; मात्र सर्वच गोष्टी मॅचिंग नसतील तरी चालू शकतील हे लक्षात ठेवा.

• साडीसोबत खूप मोठ्या आकाराची पर्स घेऊ नका. ती साडीवर शोभून दिसणार नाही. साडी खूप खाली किंवा खूप वर नेसू नका. आज साडी खाली नेसण्याची फॅशन जरी असली तरी तुम्हाला व्यवस्थित सांभाळता येईल अशी साडी नेसा. साडी नेसताना किती पदर घ्यायचे आहेत किंवा एक पदर पिनअप करून घेणार आहात हे त्या साडीनुसार ठरवा. साडी नेसल्यावर तुमचा पेटीकोट किंवा ब्रा दिसत नाही ना याची काळजी घ्या.

• साडी किंवा ब्लाऊज पिनअप करताना पिन दिसत नाही ना हे तपासून बघा. साडी नेसल्यावर एकदा व्यवस्थित बघा की ती व्यवस्थित नेसली गेली आहे ना यामुळे तुमचा लूक परफेक्ट होण्यास मदत होईल.

• साडीवर हलकासा मेकअप करा. दिवसाची वेळ आणि कोणता कार्यक्रम आहे त्यानुसार मेकअपचा पर्याय निवडा.
• साडीवर ब्लाऊज कसा निवडता यावर सुध्दा अनेक गोष्टी अवलंबून आहेत तेव्हा त्याचा जरूर विचार करा.

 आता काही वेगळ्या टिप्स ; हेही आजमावून पाहा

■ बनारसी आणि सिल्कच्या साड्या कोरड्या व पांढऱ्या कापडाने लपेटून ठेवल्यास साड्यांना कसर लागत नाही आणि जरही काळी पडत नाही.
■ रंगीत कपड्यांचा रंग आहे तसा राखण्यासाठी ते कपडे नेहमी उलटे करून सावलीतच वाळवावेत.
■ कपड्यांवरील डांबराचे डाग नेलपॉलिश रिमूव्हरने घालवावेत.
■ कूकरमध्ये अधूनमधून लिंबाची फोड टाकून पाणी ओतून उकळावे. यामुळे कूकर चमकदार होईल.
■ डिंकाचे डाग घालवण्यासाठी निलगिरी तेल लावून कपडा एखाद्या साबणाने धुवावा. डाग नाहीसा होईल.
■ जर चपात्या उरल्या तर त्या तेलात भरपूर लाल होईपर्यंत तळून घ्या. त्यामध्ये मीठ-मसाला टाकून चहासोबत खा.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!