संतोष देशमुख प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची हत्या, घरात आढळला मृतदेह, खळबळजनक माहितीने सगळेच हादरले….

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या महिलेची पोलिसांनी चौकशी केली तसेच संतोष देशमुख यांच्या वर आरोपासाठी उभी करण्यात आलेल्या महिलेचा मृतदेह तिचा राहत्या घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेचा मृतदेह घरात पडून तिचा दुर्गंध सुटल्याने सदरचा प्रकार उजेडात आला आहे. होती. दरम्यान या महिलेचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत तपास सुरू आहे.
घराचे दार तोडून मृतदेह बाहेर काढला गेला आहे. मात्र आता संबंधित महिलेचा मृत्यू कसा झाला? तिची हत्या झाली का? हत्येमागे कोण? याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत ट्विट करत त्या महिलेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
असे असताना मात्र पोलिसांनी या महिलेच्या मृत्यूबाबत वेगळीच माहिती दिली आहे. यामुळे नेमकं खर काय याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी दमानिया यांनी केलेले आरोप पोलिसांनी फेटाळले आहेत. मात्र दमानिया म्हणाल्या, गूढ संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात या महिलेची चौकशी झाली आहे. तसेच संतोष देशमुखांवर आरोप करण्यासाठी या महिलेला तयार करण्यात आल्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. ही महिला कळंब शहरातील द्वारकानगर मध्ये राहत होती. त्यामुळे महिलेची हत्या झाली की आत्महत्या या घटनेचे गूड तयार झाले आहे.
याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबंधातून हत्या झाली? अशी चर्चा सध्या सुरू आहे, असा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. यामुळे हे प्रकरण आणखी तापणार आहे.