शिक्षिकेने विद्यार्थिनीच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, शरीरसंबंध ठेवले व्हिडिओ कॉल केले आणि केला हादरवणारा शेवट..


क्राईम ब्रँचने बंगळुरुतील २५ वर्षीय शिक्षिका श्रीदेवी रुदागी आणि तिच्या साथीदारांना अटक केली आहे. याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. शिक्षिका श्रीदेवी रुदागी हिने शाळेतील विद्यार्थिनीच्या वडिलांना ब्लॅकमेल करुन चार लाख रुपयांची खंडणी उकळली होती. याबाबत शिक्षिकेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

संबंधित शिक्षिकेचे एका विद्यार्थ्याच्या वडिलांसोबत प्रेमसंबंध होते. याबाबत माहिती अशी की, सतीश हे बंगळुरुमध्ये पत्नी आणि तीन मुलींसोबत राहतात. ते व्यापारी आहेत. त्यांची सर्वात धाकटी मुलगी शाळेत जाऊ लागली. त्यावेळी त्यांची ओळख श्रीदेवी रुदागी नामक शिक्षिकेशी झाली. जेव्हा ते मुलीला शाळेत सोडायला जायचे तेव्हा शिक्षिका श्रीदेवीने संपर्क वाढवला.

दोघांमध्ये मेसेज आणि व्हिडिओ कॉल सुरु झाले. यासाठी त्यांनी वेगळे सिम कार्ड आणि फोन वापरले. हळूहळू त्यांच्या भेटी वाढल्या आणि प्रेमसंबंध निर्माण झाले, नंतर तिने शरीरसंबध देखील ठेवले, मात्र तिच्या मनात वेगळंच होत. तिने विश्वास संपादन करून दोघांचे फोटो काढले. नंतर श्रीदेवीने सुरुवातीला सतीशकडून ४ लाख रुपये घेतले.

त्यानंतर जानेवारी महिन्यात तिने आणखी १५ लाख रुपयांची मागणी केली. सतीश पैसे देण्यास तयार नव्हता. त्यामुळे ती ५० हजार रुपये उसने मागण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी गेली. एक दिवस सतीश शाळेत गेला असता, तिच्या ऑफिसमध्ये दोघेजण आधीपासूनच होते. त्यांनी सतीशला त्यांचे खासगी फोटो आणि व्हिडिओ दाखवले. जर २० लाख रुपये दिले नाही, तर हे फोटो आणि व्हिडिओ त्याच्या कुटुंबाला पाठवण्याची धमकी दिली.

यामुळे त्यांना धक्काच बसला, इतके पैसे कसे द्यायचे असा प्रश्न त्यांना पडला. त्याने १.९ लाख रुपये लगेच दिले. पण त्यांची मागणी वाढतच राहिली. १७ मार्चला श्रीदेवीने सतीशला फोन केला. तिने सांगितले की, ५ लाख रुपये एका माजी पोलीस अधिकाऱ्याला द्यायचे आहेत. सागर आणि काळे यांना प्रत्येकी १ लाख रुपये द्यायचे आहेत. आणि ८ लाख रुपये स्वतःसाठी ठेवायचे आहेत.

सतीशने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी श्रीदेवी, सागर आणि काळे यांना अटक केली. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी तपास केला असता हा सगळा प्रकार समोर आला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!