महिलेने भर रस्त्यात दिला बाळाला जन्म, रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप….


जळगाव : येथील चोपडा तालुक्यातील बोरमळी गावातील एका आदिवासी महिलेला योग्य वैद्यकीय सेवा न मिळाल्याने भररस्त्यात बाळाला जन्म द्यावा लागला. यामुळे आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे काढले जात आहेत. यामुळे शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या घटनेवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

त्यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत संताप व्यक्त केला आहे. आपण ऐकत आहोत की भारत जगात चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था झाली आहे, जपानलाही मागे टाकले आहे. पण या विकासाच्या गाजावाजाच्या घोषणांमध्ये, आपल्या राज्यात एक बाई रस्त्यावर बाळंत होतेय, ही किती मोठी शोकांतिका आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. आजही माझ्या लाडक्या बहिणीला रस्त्यावर बाळंत व्हावं लागत असेल, तर ही प्रगत भारताची जाहिरात खोटेपणाचे उत्तम उदाहरण आहे. आपण यावर मिरवण्याऐवजी लाज वाटायला हवी.

तसेच स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग आणि मंत्री यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे, याठिकाणी चार मंत्री आहेत, पण तरीही आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे. प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर त्या महिलेला दवाखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणतीही मदत मिळाली नाही.

दरम्यान, अजून किती दिवस माझ्या लाडक्या बहिणीची प्रगतिशील भारताच्या खोट्या जाहिरातीच्या मागे अशी हेळसांड होत राहील. ही घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमळी येथील आहे. अशी पोस्ट त्यांनी केली आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!