आर्चीसोबत लग्न करणार का? कृष्णराज महाडिक यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले, आम्ही….

मुंबई : युट्यूबर आणि उद्योजक कृष्णराज महाडिक म्हणजे, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव. कृष्णराज महाडिक आपल्या सोशल मीडिया डल्सवरुन शेअर केलेला फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. फक्त व्हायरलच नाहीतर, या फोटोमुळे कृष्णराज महाडिक यांच्या लग्नाच्या चर्चांनीदेखील जोर धरला आहे.

तसेच खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक यांचा ‘सैराट’ फेम, अभिनेत्री रिंकू राजगुरुसोबतचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दोघांच्या एकत्र फोटोमुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
कोल्हापुरातील श्री महालक्ष्मीच्या मंदिराबाहेरील फोटो व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर लग्नाची चर्चा सुरु झाल्यानंतर धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्यात तसं काही नाही, तसं काही समज करून घेऊ नका, असं कृष्णराज महाडिक यांनी स्पष्ट केले.

कृष्णराज महाडिक म्हणाले, आम्ही ठरवूनच भेटलो होतो. फोटोचा वेगळा अर्थ काढला जातो. माझ्या रिसेंट ब्लॉगमध्ये लग्नाची चर्चा झाली होती. मी फक्त एवढीच रिक्वेस्ट करतो की, तसं काही समज करून घेऊ नका.
दरम्यान, २०२५ मध्ये यंदा कर्तव्य असल्याच्या वडिलांच्या वक्तव्यावर बोलताना कृष्णराज म्हणाले, ‘मोठे भाऊ लग्न झालं. त्यामुळे तिसऱ्यावर प्रेशर असतो. घरात मग चालूच असतं. व्लॉग आहे. आमची मजा मस्ती चालते. वडील बोलून गेले. तो सुद्धा बातमीचा विषय झाला. लग्न कधी होणार, काय होणार हे मला पण माहीत नसतं. स्वयंवर ठेवणार आहे. मला भरपूर कॉल येतात. तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की, अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका’.