एकच ईव्हीएम असणार की अनेक? चार जणांना मतदान कसं करायचं? पालिका निवडणुकीतील मतदानाची संपूर्ण माहिती वाचा..


पुणे : राज्यात २९ महापालिकांचा निवडणुका आहेत. कुठे युती आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या जात आहेत. तर कुठे स्वतंत्रपणे. राज्यात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटासोबत अजित पवारांची राष्ट्रीवादी असून ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत.

मुंबई, ठाणे आणि पुणे सारख्या बड्या महापालिकांचाही समावेश आहे. तब्बल नऊ वर्षानंतर महापालिका निवडणुका होत असल्याने मतदारांचा उत्साहही शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे पारापारावर, नाक्या नाक्यावर फक्त आणि फक्त निवडणुकीच्या चर्चा ऐकायला येत आहेत. पण या निवडणुकीतील काही गोष्टी संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत. काही ठिकाणी वॉर्डनिहाय तर काही ठिकाणी प्रभागनिहाय निवडणुका होत आहे.

त्यामुळे वॉर्ड आणि प्रभागात काय फरक असतो हेच लोकांना कळत नाहीये. काही ठिकाणी पहिल्यांदाच प्रभागपद्धतीने मतदान होणार असल्याने तीन उमेदवारांना किंवा चार उमेदवारांना मतदान कसं करायचं? त्यासाठी ईव्हीएम मशीन चार असतील की एकच असेल की दोन असतील? चार मतदान करायचे तर मग बोटाला चारवेळा शाई लावायची का? असे एक ना अनेक प्रश्न मतदारांना पडले आहेत.

मतदान कसं करायचं?

4 सदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये मतदान प्रक्रिया कशी असेल ते जाणून घेऊया…

मतदान केंद्रावर कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 4 EVM म्हणजेच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन असतील.
तुम्हाला मतदान एकूण 4 म्हणजेच (अ) जागा, (ब) जागा, (क) जागा आणि (ड) जागेसाठी करणे आवश्यक आहे.

उमेदवारांच्या संख्येनुसार याच चारही जागांची आखणी EVM वर होईल. कदाचित या चारही जागा दोन EVM वर आखल्या जाऊ शकतात.
चारही जागेसाठी मतपत्रिकांचे रंग वेगवेगळे दिलेले असतील. ‘अ’ जागेसाठी पांढरा रंग, ‘ब’ जागेसाठी गुलाबी रंग, ‘क’ जागेसाठी पिवळा रंग आणि ‘ड’ जागेसाठी निळा रंग असेल.

प्रत्येक मशीनवर उमेदवाराचे नाव व त्याचे निवडणूक चिन्ह असेल. ‘अ’ जागेत खालील योग्य उमेदवारासमोरील बटण दाबा, लाल लाइट लागेल. याचा अर्थ अ जागेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.

‘ब’ ,’ क’ आणि ‘ड’ या उर्वरित तिन्ही जागांसाठी हीच पद्धत वापरा.
एखाद्या निवडणूक जागेसाठी उमेदवार योग्य आणि सक्षम वाटत नसेल तर मशीनवरील NOTA – None of the above किंवा वरीलपैकी कोणीही नाही असा होतो, ते बटण तुम्ही दाबू शकता.

तुमचं एक मत देशाचं भविष्य बदलू शकतं. त्यामुळे विचार करून योग्य उमेदवा निवडण्याचा प्रयत्न करा.
ड जागेसाठी मतदान केल्यानंतर बझर वाजेल. याचा अर्थ तुमची चारही जागांसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!