यंदा दुष्काळ पडणार? यंदा अल निनो पॅटर्न, हवामान खात्याचा इशारा..
मुंबई : सध्या पावसाळा तोंडावर आला आहे. पॅसिफिक महासागरात अल निनो पॅटर्न विकसित होण्याची ९० टक्के शक्यता आहे. यापूर्वीही एल निनोमुळे भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. यामुळे कमी पावसाचा धोका संभवतो.
ज्या वर्षांत हा पॅटर्न तयार होतो, त्या वर्षांत दुष्काळ आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वाढते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार यंदा पाऊस सामान्य असेल. यामुळे दुष्काळ पडण्याची शक्यता आहे.
असे असताना मात्र, अल निनोचा विकास जून ते सप्टेंबरदरम्यानच होणार आहे. त्यामुळे मान्सून सरासरीपेक्षा कमी राहू शकतो. विशेष हवामान पॅटर्न अल निनो पॅसिफिक महासागराशी संबंधित आहे.
जेव्हा त्याच्या मध्य आणि पूर्व भागातील तापमान सामान्यपेक्षा जास्त असते, तेव्हा हा बदललेला पॅटर्न तयार होतो. त्यामुळे भारतीय द्वीपकल्पात मान्सूनचे चक्र कमकुवत होते. त्यामुळेच पाऊस कमी पडतो. यामुळे दुष्काळ पडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.