ब्रेकिंग! राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येणार? बड्या नेत्याच्या विधानामुळे उडाली खळबळ…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले आहेत. यामुळे सध्या काही आमदार इकडे तर काही तिकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कोणत्या गटाची साथ द्यावी असा प्रश्न पडत आहे. तसेच मागील काही दिवसांपासून हे दोन्ही गट येणार असल्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. तशा बातम्या देखील पुढे येत आहेत.
त्यावरून आता अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी सूचक विधान केले आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे दोन्ही गट एकत्र येतात का हे पाहण्यासाठी तुम्हाला काही काळ थांबावं लागणार आहे.
काळाच्या ओघात याची उत्तरे मिळतील, असे ते म्हणाले. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांची दोनवेळा भेट घेतली. या भेटीदरम्यान या गटाने शरद पवार यांना भाजपच्या नेतृत्वातील एनडीएत येण्याची विनंतीही केली होती.
यामुळे या चर्चा वाढल्या आहेत. यामुळे आता तटकरे यांनी केलेल्या या वक्तव्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या काळात या दोन्ही गटाची काय भूमिका असे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.