लाडकी बहीण योजना बंद होणार? आर्थिक अडचणींबाबत मोठा खुलासा, मंत्र्यांचं स्पष्ट वक्तव्य…

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

मात्र योजनेतील गैरप्रकार उघडकीस आल्यावर ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली होती. त्याची मुदत काल (३० एप्रिल) रोजी संपली. आता या योजनेसंदर्भात महायुतीमधील मंत्र्यांनीच एक महत्वाचं विधान केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते , मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाडकी-बहीण योजनेबद्दल मोठं विधान केलंय. ही योजना बंद होणाहर, अशा वावड्या अधूनमधून उठत असतात. मात्र आता त्यावर खुद्द महायुतीमधील मंत्र्यांनीच वक्तव्य केलं आहे.

नंदुरबार येथे बोलताना हसन मुश्रीफ यांनी लाडकी बहीण योनजेवरही भाष्य केलं. लाडकी बहीण योजनेमुळे कुठल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पगार मिळत नाही आहे असं कुठेही निदर्शनास आलं नाही. लाडक्या बहिणी योजनेमुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती चालू राहणार आहे.

महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे. या योजनेमुळे विकास कामांना निधी कमी मिळत नाही, असं म्हणत मुश्रीफ यांनी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.