पुन्हा होणार देश लॉकडाऊन? चीननंतर आता HMPV भारतात आलाच, ८ महिन्यांच्या मुलाला लागण…

नवी दिल्ली : रोव्हायरसने अमेरिकेत धुमाकूळ घातला असून अनेकजणांना याची बाधा झाली आहे. हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणू आहे, जो तोंडावाटे किंवा विष्ठेच्या मार्गाने, दूषित अन्न, पाणी किंवा पृष्ठभागाद्वारे पसरतो. आजार आता जगभरात चिंता वाढवत असल्याचे समोर आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चीननंतर आता भारतातही HMPV आढळून आला आहे. भारतात HMPV चा पहिला रुग्ण सापडला आहे. कर्नाटकच्या बंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयात ८ महिन्यांच्या मुलामध्ये HMPV चे प्रकरण आढळलं आहे. कर्नाटक आरोग्य विभागाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती दिली आहे.
मुलाचा प्रवासाचा इतिहास नाही. रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्यांनी एचएमपीव्हीची पुष्टी केली आहे. कर्नाटक आरोग्य विभाग ICMR आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पुढील निर्देशाची वाट पाहण्याची शक्यता आहे.
दरम्यान हा व्हायरस भारतात येण्याआधी आरोग्य सेवांचे महासंचालक (DGHS) डॉ. अतुल गोयल यांनी सांगितले आहे की, मानवी मेटापन्यूमोव्हायरस इतर श्वसन विषाणूंप्रमाणे आहे, ज्यामुळे सामान्य सर्दी होते. यामुळे तरुण आणि वृद्ध लोकांमध्ये फ्लूसारखी लक्षणं दिसू शकतात.