शरद पवारांचे ७ खासदार तुमच्या पक्षात येणार आहेत? अजित दादांनी थेट सगळंच सांगून टाकलं, म्हणाले…

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळालं, मात्र यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात बहुमताने महायुतीचं सरकार आलं. यानंतर पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ७ खासदारांना आपल्या पक्षात सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्न केला गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या खासदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या या आरोपांवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, तुम्ही धादांत खोटे बोलत आहात. यामध्ये स्वत: तिथल्या तीन ते चार खासदारांचं, निलेश लंके, अमर काळे आणि अजून एक कोणीतरी, त्यांनी स्वत: बाईट दिलेला आहे की, आमच्याशी खासदार सुनील तटकरे किंवा कुणीही संपर्क साधलेला नाही.
तुम्ही ज्यांची विश्वासाहर्ता आहे अशांची नावे घेत चला. त्यामुळे पुराव्यासहीत जर तुम्ही म्हणताय की, अजित पवारांनी केले, अहो पण ती लोकं सांगत आहेत की, तसे काही झालेले नाही. मग उगाच कशाकरता आरोप करायचा? आज २० ते २२ लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व करतात.