डोनाल्ड ट्रम्प आल्यामुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? महत्वाची माहिती आली समोर..


नवी दिल्ली : भारतात पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीही तसे संकेत दिले आहेत. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली.

या शपथविधीनंतर भारतासह जगातील ७० टक्क्यांहून अधिक आयात करणा-या देशांच्या अपेक्षा पुन्हा एकदा वाढल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनानंतर अमेरिका पुन्हा एकदा कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवेल, अशी अटकळ बांधली जात आहे.

त्यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा अधिक होऊन भाव नियंत्रणात येतील. त्यामुळे जे देश आपल्या गरजेच्या ७० टक्क्यांहून अधिक तेल आयात करतात, त्या देशांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मंगळवारी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील नवीन प्रशासनाच्या तेल आणि वायूचे उत्पादन जास्तीत जास्त करण्याच्या योजना लक्षात घेता, जास्त प्रमाणात अमेरिकन तेल भारतात येण्याची शक्यता आहे. भारताला तेल पुरवठादारांची संख्या आधीच २७ वरून ३९ पर्यंत वाढली आहे आणि जर आणखी तेल आले, तर भारत त्याचे स्वागत करेल.

दरम्यान, तेल आणि वायू उत्पादन वाढवण्याच्या दिशेने ट्रम्प प्रशासनाच्या पावलांबद्दल विचारले असता पुरी म्हणाले की, जर तुम्ही मला विचाराल की, जास्तीचे अमेरिकन इंधन बाजारात येणार आहे का, तर माझे उत्तर होय आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात इंधनाची अधिक खरेदी होण्याची दाट शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!