मोठी बातमी! मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देणार? अजित पवारांची घेतली भेट, राजकीय घडामोडींना वेग…

मुंबई : बीड मधील संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यामुळे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. सध्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसाच्या ताब्यात आले नसल्याने या प्रकरणातील तपास वेगाने सुरू असून एसआयटी पथकाच्या हालचाली वेगवानपद्धतीने सुरू आहे.
याबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. असे असताना अजित पवार परदेशात होते. आता मात्र अजित पवार मुंबईत आले असून मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांची भेट घेतली आहे. यामुळे ते राजीनामा देणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अजितदादांच्या मंत्रालयातील दालनात त्यांच्या भेटीसाठी मुंडे दाखल झाले असून दोघांमध्ये गेल्या 15 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. त्यामुळे नेमका कोणता निर्णय घेणार धनंजय मुंडे घेणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. हे प्रकरण राज्यभर गाजत असून या प्रकरणी सध्या दबाव वाढला आहे.
दरम्यान, संतोष देशमुख प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे. याबाबत अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. आता दोन मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. दोघांनाही न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वाल्मिक कराडचे संबंध धनंजय मुंडे यांच्यासोबत आहे. तपासावर परिणाम होऊ नये, यासाठी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. तर, भुजबळांनी मुंडेंच्या राजीनाम्याला विरोध दर्शवला आहे. त्यावर भाष्य करताना भुजबळांनी मनात दाबून ठेवलेली सल बोलून दाखवली.
बीड प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याला छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. बीड प्रकरणातील दोषींवर कारवाई होणारच असल्याचे त्यांनी म्हटले. धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागताय, असा सवाल त्यांनी केला.