महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद भूषवणार? चाहत्यांना खुश करणारी बातमी आली समोर…

नवी दिल्ली : एमएस धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे का? या प्रश्नाने धोनीच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कारण संघाचा सध्याचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आजच्या सामन्यासाठी अनुपलब्ध राहू शकतो आणि अशा स्थितीत महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा संघाची कमान सांभाळू शकतो, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
गायकवाडला आधी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना गायकवाडला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याने सरावही केला नाही. आता आज ५ एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यासाठी तो उपलब्ध नसेल, तर चेन्नईसाठी महेंद्रसिंग धोनी हा एकमेव पर्याय असेल, जो पुन्हा एकदा संघाची कमान सांभाळू शकेल.
दरम्यान, जर ऋतुराज आजच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात खेळण्यास असमर्थ ठरला, तर CSK संघासाठी नव्या कर्णधाराची गरज निर्माण होणार आहे. संघात सध्या दुसरा ठोस पर्याय उपलब्ध नसल्याने, साऱ्या नजरा पुन्हा एमएस धोनीकडे वळल्या आहेत. हसीने याबाबत उघडपणे धोनीचे नाव न घेतले तरी संकेत स्पष्ट दिले आहेत.
धोनी सध्या केवळ खेळाडू म्हणून संघात असला तरी त्याचं मार्गदर्शन आणि अनुभव संघासाठी अमूल्य आहे. जर तो पुन्हा कर्णधार म्हणून पुढे आला, तर चाहत्यांसाठी ते एका स्वप्नपूर्तीसारखं ठरेल. चेपॉक स्टेडियममध्ये ‘थाला’ला पुन्हा एकदा नेतृत्व करताना पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणं, हे उत्साही क्षण ठरू शकतात.