जीजूसोबत फोनवर बोलू दिलं जातं नाही म्हणून बायकोची सटकली, केलं आक्रीत, थेट नवऱ्याचे गुप्तांगच कापले…


उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिजूसोबत फोनवर बोलू दिलं नाही त्यामुळे बायको संतापली नवरा-बायकोमध्ये यावरून कडाक्याचे भांडण झालं. त्यानंतर रागाच्या भरात बायकोने नवऱ्याचे गुप्तांग कापलं. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.

ही घटना उत्तर प्रदेशच्या असमोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात घडली आहे. बचावासाठी या महिलेचा नवरा जोरजोरात ओरडू लागला. त्यावेळी शेजारी राहणाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बायकोच्या तावडीतून नवऱ्याची सुटका केली आहे. त्यानंतर महिलेने ॲसिड प्यायले.

दोघांनाही गंभीर अवस्थेमध्ये मुरादाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी महिलेच्या नवऱ्याने आरोप केला की, माझी बायको मला जीवे मारणार होती पण शेजाऱ्यांनी मला वाचवले. हल्ला झाल्यानंतर माझ्या कुटुंबीयांनी आणि गावातील नागरिकांनी माझ्या बायकोच्या कुटुंबीयांना फोन करून तिने केलेल्या धक्कादायक कृत्याबद्दल सांगितले.

पीडित व्यक्तीने पुढे असे देखील सांगितले की, ‘शेजाऱ्यांनी माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकला त्यामुळे ते मला वाचवण्यासाठी आले. नाही तर त्या दिवशी माझ्या बायकोने माझी हत्या केली असती. कारण तिच्या हातामध्ये चाकू होता. या चाकूनेच तिने माझा प्रायव्हेट पार्ट कापला. माझ्या पायाला तिने चावा घेतला. त्यानंतर मी बेशुद्ध पडलो.

दरम्यान, या घटनेनंतर पीडित व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांनी बायकोविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तर दुसरीकडे महिलेच्या कुटुंबीयांनी तिच्या सासरच्या व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!