कोण वाघ्या? सरकार काय बोळ्याने दूध पितं का? खासदार उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर….

पुणे : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिवाजी महाराजांच्या सातत्याने होणाऱ्या अवमानाबाबत त्यांनी मोठं वक्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान होतो, त्यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केली जातात. मुख्यमंत्री यांनी यासंदर्भात आमचं सगळं ऐकलं पाहिजे, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.
असे अवमान होत असेल तर सरकारच्या सगळ्यांना कळायला हवं. अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण? मुख्यमंत्री आणि सरकार काय बोळ्याने दूध पिताय का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. तसेच वाघ्याच्या समाधीवरही ते म्हणाले कोण वाघ्या? सध्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोललं जातंय.
याबाबत सरकारने कठोर कायदा करत मकोको प्रमाणे कायदा आणावा. त्यात अजामीन पात्र शिक्षा आणि किमान दहा वर्षाची शिक्षा व्हायला पाहिजे. आता पर्यंत अनेक अधिवेशन झाले, अलिकडे अधिवेशन पार पडलं. यात का कायदा करण्यात आला नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. महापुरुषांचा अपमान व्हावा, अस सर्व लोकप्रतिनिधींना वाटतं का? असेही ते म्हणाले.
दरम्यान, अश्या प्रवृत्तींमुळे समाजामध्ये दुही पसरतेच परंतु राज्यातील देशातील कायदा आणि सुव्यवस्था देखिल बिघडते. शेजारी राहणाऱ्यांची मने कुलूषित होतात आणि त्याचे दिर्घ परिणाम समाजाला भोगावे लागतात ही वस्तुस्थिती आहे. असेही ते म्हणाले. पुण्यातील वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली जाते आहे.
त्यासाठी उदयनराजे वढू बुद्रुक येथे आले होते आणि त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीला अभिवादन केलं. यावेळी बोलताना सातत्याने होणाऱ्या महापुरुषांच्या अपमानकार वक्तव्यावर त्यांनी सरकारवर टीका केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.