मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या बैठकीसाठी पैसे कोण देत? लक्ष्मण हाकेंच्या वक्तव्याने वादाला ठिणगी


पुणे : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मोठं आंदोलन उभारलं, त्यांनी आरक्षणासाठी अनेकदा उपोषण देखील केली. दरम्यान आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे, येत्या 29 ऑगस्टला मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या गावागावांमध्ये बैठक होत असतात.आता यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेच्या बैठकीला पैसे कोण देतं असं वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जरांगे पाटील यांच्या या बैठका सरकार पुरस्कृत असल्याचं हाके यांनी म्हटलं आहे.ही राज्यकर्ते पुरस्कृत झुंडशाही आहे, जरांगेंना या बैठकांसाठी एका मतदारसंघातून आमदार 10 ते 15 लाख रुपये देतात, असा आरोपही हाके यांनी केला आहे. दरम्यान यामुळे आता नव्या वाद्याला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

दरम्यान ओबीसीमध्ये आरक्षण घेऊन मराठा समाजाला व्यवस्था हातात घ्यायची आहे. आरक्षणाच्या माध्यमातून नोकरशाहीमध्ये आपली लोक घुसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील कोणत्याच नेतृत्वाकडून आता अपेक्षा नाही. त्यामुळे यासंदर्भात केंद्रातील ओबीसी नेत्यांना साकडे घालणार आहोत असंही यावेळी हाके म्हणाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!