मगर बघताना अचानक तिच्यासमोर पडला अन् मगरींनी केले तुकडे- तुकडे, घटनेने उडाली खळबळ…

नवी दिल्ली : काही ठिकाणी जात असताना काळजी घेणे गरजेचे असते. आता कंबोडियामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
कंबोडियातील एक व्यक्ती मगरींच्या गोठ्यात पडला, त्यानंतर सर्व मगरी त्याच्यावर तुटून पडल्या आणि त्याच्या शरीराचे तुकडे केले. हा माणूस काठीच्या सहाय्याने मगरीला दूर करत होता.
अचानक मगरीच्या घेरात पडला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. ही घटना कंबोडियातील सिएम रीप शहरातील आहे. याठिकाणी लुआन नावाच्या ७२ वर्षीय व्यक्तीचे मगरींचे फार्म आहे.
तेथे मगरी मोठ्या प्रमाणात आहेत. एका मगरीने अंडी घातली होती आणि लुआन त्या मगरीला काठीने हुसकावण्याचा प्रयत्न करत होता, या वेळी मगरीने लुआनची काठी तोंडात पकडली आणि असा धक्का दिला की लुआन अनियंत्रितपणे मगरींच्या गोठ्यात पडला. यामुळे दुःखद घटना घडली.
Views:
[jp_post_view]