काटा काढताना ७२ वेळा वार, गुप्तांगही कापलं, कारण काय? सतीश वाघ हत्या प्रकरणी अक्षय-मोहिनी यांचा भयंकर खुलासा


पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आले आहेत. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच सुपारी दिली होती. पत्नीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. पुण्यातील मांजरी परिससरात ९ डिसेंबरला पहाटे साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली.

सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेतला. पोलिसांनी तपास केल्यानंतर सतीश वाघ यांच्या हत्येला पत्नी मोहिनी वाघ यांच्या अनैतिक संबंधाची किनार असल्याचे स्पष्ट झाले.

हल्लेखोरांनी सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर त्यांच्या अंगावर जवळपास ७२ वार करण्यात केले. सतीश वाघ हे दारू पिऊन मोहिनी वाघ यांना सतत त्रास देत होते तसेच प्रेमसंबंधात आड येत होते, त्यामुळे मोहिनी यांनी ५ लाखांच्या हत्येची सुपारी हल्लेखारांना दिली, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली होती.

सतीश वाघ याचे अपहरण केल्यानंतर वाघ यांच्या अंगावर 72 चाकूचे वार केले. मारेकरी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी सतीश वाघ यांचे गुप्तांग देखील कापले. घटनेनंतर ज्यावेळी पोलीस मोहिनी वाघ यांच्या घरी चौकशीसाठी गेले, त्यावेळी पतीच्या जाण्याने आपल्याला दु:ख झाल्याचे नाटक करून पतीसोबत किती छान जमायचे, त्याचे काही प्रसंग मोहिनी यांनी कथन केले.

यादरम्यान दर काही मिनिटांनी ती मोठ्याने रडायची. आपल्या रडण्याने आणि आक्रोशाने पोलिसांना आपल्यावर संशय येणार नाही, असे मोहिनीला वाटले. मात्र मोहिनीच्या जवळच्या व्यक्तीनींच पोलिसांना अक्षय जवाळकर याच्याशी तिचे गेल्या काही वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचे सांगितले.

त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास केला. तेव्हा मुख्य आरोपी अक्षय जावळकर फरार होता. अक्षयचे फरारी असणे, हे संकेत त्याचा हत्येतील सहभाग पक्का असल्याचे पोलिसांना वाटले. त्यानुसार पुढील काही दिवसांत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यावर प्रकरणाचा छडा लागला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!