नवीन जिल्हा कोणता? बारामती की शिवनेरी, पुणे जिल्ह्याच्या विभाजनाच्या चर्चा सुरू…
पुणे : नुकतेच पुणे जिल्ह्याचे विभाजन करा, अशी मागणी भाजप आमदार महेश लांडगेंनी केली. यासाठी आमदार लांडगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्रही लिहिले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
पुणे जिल्ह्याचे विभागजन करुन नवीन जिल्ह्याचे नाव ‘शिवनेरी’ द्या अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्याचे विभाजन करून दोन जिल्हे करण्याचा विचार मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.
दरम्यान, यावर निर्णय घेण्यासाठी समितीसुद्धा स्थापन झाली. या समितीने अहवाल सादर केला आहे. त्यात बारामती जिल्हा करण्याची शिफारसही केली आहे.
असे असले तरी हा अहवाल मागील सात वर्षांपासून शासन दरबारी धूळखात पडून आहे. आता आमदार
आमदार लांडगे यांच्या मागणीमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आता काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Views:
[jp_post_view]