कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार? देवेंद्र फडणवीस यांचे मोठं विधान, म्हणाले, राज्य सरकार दिलेला..


पुणे : गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीवरून राज्यात चर्चा सुरु आहेत. अनेक नेत्यांकडून आश्वासनंही दिली जात आहेत. त्यातच आता सरकार योग्यवेळी शेतकरी कर्जमाफीचा आपला शब्द पूर्ण करेल.

सरकार दिलेला आपला एकही शब्द फिरवणार नाही. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुन्हा एकदा दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे जागतिक योग दिनानिमित्त आयोजित ‘वारकरी भक्तीयोग’ या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती लावली. या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारण्यात आला आहे.

या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी होईल, असं म्हटलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात पत्रकारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शब्द महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत दिला होता. तो शब्द फिरवलाय का अशा चर्चा सुरु असल्याचा प्रश्न विचारला. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं.

ते म्हणाले, मी कर्जमाफी बाबत सविस्तर मी सांगितले आहे, कर्जमाफी कधी करायचे यासंदर्भात त्याचे काही नियम आहेत. कर्जमाफीची एक पद्धत आहे, या सरकारनं दिलेला एकही शब्द फिरवत नाही, उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय घेतला जाईल.

देवेंद्र फडणवीस यांनी योग जगभरात पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केल्याचं म्हटलं. आज अनेक ठिकाणी योग होत आहे. पुण्यात आज योग करण्यात आला, पुण्यात आज वारी आहेत,वारकरी बंधू सोबत योग करण्यात आला, एकाच वेळी ७०० ठिकाणी योग करण्यात आला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!