सोने , चांदीला नवी चकाकी ! सराफा बाजारात कधी रुपये बाजारभाव वाढला ते पहा.. !!

नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात सोने-चांदीच्या किमतीत या आठवड्यात जबरदस्त तेजी दिसून आली आहे. या व्यवहाराच्या आठवड्यात सोन्याच्या दरात ७६६ रुपये प्रती १० ग्रॅमची तेजी नोंदली गेली, तर चांदीच्या दरात २,९०७ रुपये प्रती किलोग्रॅमची मजबूती आली आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन च्या वेबसाईटनुसार, या व्यवहाराच्या आठवड्याच्या सुरूवातीला सोमवारी (१ जुै) २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,८७४ होता, जो शुक्रवार (५ जुलै) पर्यंत वाढून ७२,६४० रुपये प्रती १० ग्रॅमवर पोहोचला. तर, ९९९ शुद्धतेच्या चांदीचा दर ८७,८०२ वर वाढून ९०,७०९ रुपये प्रती किलोग्रॅमवर पोहोचला आहे.
Views:
[jp_post_view]