घायवळला पासपोर्ट नेमका कधी मिळाला? महाविकास आघाडीच्या काळात..; आता प्रकरणात नवीनच माहिती उघड…


पुणे : पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड निलेश बन्सीलाल घायवळ याचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. घायवळ बनावट कागदपत्रांच्या आधारे परदेशात पळून गेल्याने राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.

विरोधा पक्षाने हे प्रकरण उचलून धरले असून सत्ताधाऱ्यांनी तोफ डागली आहे. अशातच भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या प्रकरणात उडी घेत ‘घायवळला पासपोर्ट महाविकास आघाडीच्या काळात देण्यात आला होता. असा दावा केला आहे.

सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषद घेत घायवळ प्रकरणावर आपली भूमिका मांडली. निलेश घायवळ याला पासपोर्ट मिळाला त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होतं. त्यामुळे याबाबतची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी अशी थेट असे शिरोळे यांनी म्हटले आहे.

       

निलेश घायवळ याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट घेतला त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार राज्यांमध्ये होतं महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातच निलेश घायवळ याला पासपोर्ट मिळाला आहे.

घायवळ हा मूळचा कर्जत जामखेड मतदार संघातील अहिल्यानगर सोनेगाव येथील रहिवासी आहे. त्याने पासपोर्ट देखील त्याच्या मूळ गावात तयार केला आहे. त्याच्यावर त्या मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल असताना आणि त्याने दिलेला पत्ता खोटा असताना देखील पोलिसांच्या व्हेरिफिकेशनच्या आधारे पासपोर्ट देण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली हा रिपोर्ट दिला याबाबतची चौकशी होणे आवश्यक आहे.

जेव्हा पासपोर्ट देण्यात आला त्यावेळेस महाविकास आघाडीचे सरकार होतं तसंच कर्जत जामखेडमध्ये कोण आमदार होते? राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि मुख्यमंत्री कोण होते. त्यामुळे या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करावी आणि प्रकरणात नेमकं कोण दोषी आहे हे शोधून काढावं अशी आमची मागणी शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!