काय सांगता!! बायकोचा नांदायला येण्यास नकार, नवऱ्याने केलं असं काही की सगळेच पाहतच राहिले, नेमकं घडलं काय?

बायकोने सासरी नांदायला यायला नकार दिला असल्याने बीडमध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे. वैतागलेल्या नवऱ्याने थेट आमरण उपोषण सुरू केलं आहे. यामुळे यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत माहिती अशी की,वडिल, भाऊ आणि भावजयीच्या त्रासाला कंटाळून पत्नी सासरी नांदायला येत नाही. त्यामुळे तातेरावने गावातील खंडोबा मंदिरातच आमरण उपोषण सुरू केलं आहे. तातेरावचा माजलगाव येथील लक्ष्मी नावाच्या महिलेशी विवाह झाला होता. 2002 साली त्यांचे लग्न झाले होते. मात्र त्यांच्यात किरकिर सुरू होती.
याबाबतची माहिती सेलूचे ग्रामविकास अधिकारी दिपक कच्छवा यांनी दिली आहे. काही दिवसापासून त्यांच्यात रोजच किरकोळ वाद होत होते. त्यामुळं तातेरावची पत्नी लक्ष्मी माहेरी गेली होती. बायको माहेरी गेल्यानंतर तातेरावच्या जेवणाची सोय लागत नव्हती. यामुळे त्याची अडचण निर्माण झाली.
नंतर तातेराव बहिरे महिनाभरापासून सेलू येथे आला. मेहुणे बायकोला नांदवायला पाठवत नाही, अशी तक्रार तातेराव बहिरे यांनी बीडच्या जिल्हाधिकारी आणि एसपी कार्यालयात केली होती. मात्र काही होत नसल्याने त्याने उपोषण सुरू केले आहे. त्याला चार मुली आणि एक मुलगा अशी अपत्य आहेत.
दरम्यान, तातेराव बहिरे यांनी उपोषणास बसण्याआधी ग्रामपंचायत कार्यालयामधून लेखी परवानगी घेतलेली नाही. तरीदेखील याप्रकाराबाबत तलवाडा पोलीस ठाणे आणि तहसिल कार्यालयामध्ये माहिती देण्यात येईल, याची चर्चा मात्र राज्यात सुरू झाली आहे.