पुण्यात अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा काय होता प्लॅन.? धक्कादायक माहिती आली समोर

पुणे : पुणे शहरात राहणाऱ्या दोन दहशतवाद्यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. घातपात घडवण्याबाबत त्यांचा कट असल्याची कोणतीही माहिती तपासात मिळाली नाही.
परंतु या दोघांना हाताळणाऱ्या सूत्रधारांबाबत (हँडलर्स) महत्वाची माहिती एटीएसला मिळाली आहे.
याबाबत एटीएसचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी सांगितले. ही माहिती संवेदनशील असल्याने अधिक काही बोलता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
या दोघांना राष्ट्रीय तपास संस्था शोधत होती. त्यांच्यावर एनआयएने पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. यामुळे पोलीस त्यांचा तपास करतच होते.
तसेच त्यांचा समावेश मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत केला होता. महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत माहिती काढली जात आहे.
त्यांच्यासंदर्भात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी महत्वाची माहिती दिली. यामुळे आता ते कशासाठी आले होते, आणि काय करत होते हे देखील लवकरच समोर येईल.