महिलांनो घराचे सौंदर्य टिकविण्यासाठी कशी कराल गालिच्यांची साफसफाई


उरुळी कांचन : फरशीचे सौंदर्य खुलवण्यात गालिचाची मुख्य भूमिका असते. गालिचा खराब न दिसणाऱ्या मटेरियलपासून तयार होत असले तरी त्यांनाही सफाईची गरज असते. बहुतेक घरात गालिचाची सफाईच होत नाही. त्यामुळे घराचे सौंदर्य बिघडू शकते. ते सौंदर्य बिघडू नये यासाठी गालिचाची सफाई आवश्यक सते. पाहू या त्याविषयीच्या काही खास टिप्स.

 

– गालिचा साफ करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे तो ड्रायक्लीन करून घेणे. सहा महिन्यांतून एकदा तो ड्रायक्लीनला अवश्य द्या.
– जर गालिचा छोटा असेल आणि त्याचे मटेरियल खराब होणारे नसेल तर तो आपण कोणत्याही सॉफ्ट डिटर्जंटने वॉशिंग मशिनमध्येही धुवू शकता.
– गालिचावर पडलेली धूळ साफ करण्यासाठी कार्पेट ब्रशची मदत घ्या. गालिचा झाडूने कधीही साफ करू नये.
– फरशीवर पडून गालिच्यात छोटे छोटे किडे होत असतात आणि त्यात ओल व दुर्गंधीही येत असते. हे टाळण्यासाठी गालिचा महिन्यातून एकदा बाहेर काढून व्यवस्थित झाडावा आणि दिवसभर उन्हात ठेवावा.
– गडद रंगात धूळ दिसत नसते. यासाठी गालिचा नेहमी गडद रंगाचाच घ्यावा.
– गालिचा घरातील सजावट पाहूनच निवडावा. तसेच छोट्या रूमसाठी छोटा आणि मोठ्या रूमसाठी मोठा गालिचा निवडावा.
– गालिच्यामध्ये नाजूक कलाकसुर असते, त्यामुळे त्याची साफसफाई कराताना विशेष काळजी घेणे गरजेचे असते, हे लक्षात ठेवा.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!