वहिनीच्या प्रेमासाठी कायपण!! युवकाने थेट भावाचाच केला खून, घटनेने कुटूंब सुन्न….


नागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशातच आता प्रेमसंबंधात मोठा भाऊ अडसर ठरत होता. त्यामुळे वहिनीचे प्रेम मिळविण्यासाठी लहान भावाने मोठ्या भावाचा पुतण्याच्या मदतीने दगडाने ठेचून खून केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, वहिनीसोबत दीराचे सूत जुळले. त्याची कुणकुण मोठ्या भावाला लागली. यातून ही घटना घडली आहे. माधुरी आणि पंकेश या दोघांचे अनैतिक संबंध बरेच वाढले. दबक्या आवाजात वस्तीत दोघांच्या प्रेमाची चर्चा होती. याचा राग मनात होता, मात्र त्याने नाव खराब होईल, या भीतीने याबाबत लक्ष दिले नाही.

एक दिवस त्याने दोघांवर पाळत ठेवली. महिनाभरापूर्वी शेतावर जाणार असल्याचे सांगून तो तासाभरात घरी परतला. त्यावेळी पंकेश हा त्याच्या घरी आढळून आला. त्यामुळे दोघांनाही चंद्रकांतने मारहाण केली. यातून दोघांमध्ये वाद झाला.

नंतर वहिनीला नेहमी मारहाण होत असल्यामुळे पंकेश नाराज होता. त्याने पुतण्याच्या मदतीने चंद्रकांतचा खून करण्याचा कट रचला. आधी त्याला चंद्रकांतला दारु पिण्यासाठी बोलावले. त्याला जास्त प्रमाणात दारू पाजली. त्यानंतर बंटी आणि पंकेशने चंद्रकांतचा गळा आवळून खून केला.

नंतर ओळख पटू नये म्हणून त्याच्या चेहरा दगडाने ठेचला. तसेच घटनास्थळवरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी तंत्रज्ञान व गुप्त माहितीच्या आधारे हत्याकांडाचा छडा लावला. यामुळे सगळेच हादरले.

पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र घटनेने सगळे हादरले असून अनैतिक संबंधाच्या मोठ्या घटना सध्या घडत असून यातून अनेकांचे जीव देखील जात आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!