राजाच्या हत्येपूर्वी नेमकं काय घडलं? शेवटच्या क्षणांचा भयंकर व्हिडीओ समोर, सगळे हादरले…


Raja Raghuvanshi Murder : राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात एक महत्त्वपूर्ण व्हिडीओ समोर आला आहे. मेघालयातील डबल डेकर ब्रिजवर ट्रेकिंग करत असताना राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम एका पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाले होते.

विशेष म्हणजे, हा व्हिडीओ त्यांच्या हत्येच्या काही क्षण आधीचा असल्याचं समोर आलं आहे. शिलाँगमध्ये फिरायला आलेल्या देव सिंह या पर्यटकाने आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

त्याच्या म्हणण्यानुसार, २३ मे रोजी सकाळी ९:४५ वाजता त्यांनी हा व्हिडीओ शूट केला होता. त्या वेळी राजा आणि सोनम हे वरच्या दिशेने जात होते आणि ते त्यांच्या फ्रेममध्ये अचानक आले होते. त्यानंतर काही तासांतच राजा रघुवंशीचा खून करण्यात आला होता.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये सोनमने पांढऱ्या रंगाचा फुल स्लीव्ह टी-शर्ट घातला होता, तर राजा पांढऱ्या रंगाच्या स्लीव्हलेस टी-शर्टमध्ये दिसतो. देव सिंहने आपल्या पोस्टमध्ये दावा केला आहे की, सोनमने घातलेला तोच पांढरा शर्ट नंतर राजाच्या मृतदेहाजवळ सापडला. त्यामुळे या व्हिडीओचा तपासात मोठा उपयोग होऊ शकतो.

या व्हिडीओबद्दल देव सिंहने लिहिलं आहे की, राजा अगदी साधा, निरागस दिसत होता. त्याला कल्पनाही नव्हती की त्याच्यावर धोका मंडळतो आहे. त्याने पुढे लिहिलं की, माझ्याकडे आणखी एक व्हिडीओ आहे ज्यामध्ये इंदूरच्या तीन व्यक्ती दिसतात. ते या दोघांच्या सुमारे २० मिनिटे आधीच ट्रेकिंग सुरू करून गेले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

राजाच्या हत्येला २४ दिवस उलटले असले तरी रोज नवे पुरावे आणि खुलासे समोर येत आहेत. सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाहासह पाच आरोपी पोलिस कोठडीत आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांकडून घटनास्थळी सीन रिक्रिएट करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!