पुण्यात नेमकं चाललंय काय? आता पत्रकारावर झाला गोळीबार, १५ दिवसांपूर्वीही झाला होता हल्ला..

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात काल रात्री एका पत्रकारावर दोघा अज्ञातांनी गोळीबार केला. महर्षी नगर परिसरातील एका हॉटेलसमोरच ही घटना घडली आहे.
यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, १५ दिवसांपूर्वीच याच पत्रकारावर हल्ला झाला होता. हल्ल्यामागचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत.
स्वारगेट परिसरात पत्रकार हर्षद कटारिया याच्यावर गोळीबार झाला. एका हॉटेलच्या समोर ही घटना घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
कटारियावरील हल्ल्यामागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा वचक राहिले नाही का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पुण्यात गुन्हेगारी घटनांचं सत्र सुरूच आहे. कोयता गॅंग देखील दहशत निर्माण करत आहे.