राज्यात चाललंय काय? आता बड्या नेत्याला ‘तुझा पण मस्साजोगचा संतोष देशमुख करु’, अशी धमकी, थेट पत्रच पाठवलं…


बीड : राज्यात बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी अनेक मोठी नावे पुढे येत असल्याने सरकारवर टीका केली जात आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात देखील हाच मुद्दा गाजला.

या प्रकरणात बीड जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची नाव आली आहेत. सरपंच संतोष देशमुख यांची गाडी अडवून आधी त्यांचं अपहरण केलं. त्यानंतर बेदम मारहाण करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल झाले होते. मात्र अजून ठोस अशी कारवाई होत नाही.

असे असताना आता धाराशिवचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत व केशव सावंत यांना अशाच प्रकराची जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. भूम परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांचे ते पुतणे आहेत.

तानाजी सावंत हे महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री आहेत. पत्र पाठवून ही धमकी दिली आहे. या धमकीत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांसारखी हत्या करुन असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत आता ही धमकी नेमकं कोणी दिली याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान , या पत्रासोबत 100 रुपयांची नोट देखील जोडली आहे.

आमदार सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत व केशव सावंत सोनारी, वाशी, ढोकरी येथील साखर कारखान्याचा कारभार सांभाळतात. यामुळे व्यवसायातून ही धमकी दिली गेली आहे का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी त्यांच्या घरासमोर गोळीबारही झाला होता.

यामुळे आता सावंत बंधू कोणाच्या रडारावर आहेत, हा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. सावंत बंधुंना जी धमकी मिळालीय, ही नेमकं कोणत्या वादात आहे याबद्दल पोलीस तपास करत असून यामुळे मात्र सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत कारवाई होईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!