पुण्यात चाललंय तरी काय! लग्नाला नकार दिला म्हणून महिलेने…..


पुणे : लग्न करण्यास नकार दिल्यामुळे एका महिलेने तरुणाचे अपहरण केल्याची घटना पुण्यातून उघडकीस आली आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत काल एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यानंतर पुन्हा ही घटना समोर आली आहे.

पोलिस तपासात या महिलेने तरुणाचे अपहण करण्यासाठी दोन जणांना सुपारी दिल्याचे समोर आले. दरम्यान या प्रकरणी एका महिलेसह प्रथमेश यादव, अक्षय कोळी यांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर येथील २३ वर्षीय तरुण गुजरातमधील वापी येथे खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याचा भाऊ पुण्यातील एनडीए गेट रस्ता परिसरात राहतो. दरम्यान या त्याचे २० वर्षीय विवाहित तरुणीशी प्रेमसंबंध जुळले.

तरुणाच्या आई-वडिलांनी त्याचे लग्न ठरवण्यासाठी सोलापूरला बोलावून घेतल्याने विवाहित महिलीा संतापली, तिने चक्क प्रोफेशनल अपहरणकर्त्यांना पैसे देऊन. एनडीए रस्त्यावरील कोढवे धावडे परिसरातून चार दिवसांपूर्वी महिलेसह तिच्या साथीदारांनी त्या तरुणाचे अपहरण केले.

एनडीए रस्त्यावरील कोढवे धावडे परिसरातून चार दिवसांपूर्वी या तरुणाला नेण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी तपासाटी चाके फिरवली. पोलिसांना आरोपी गुजरातमधील वापी परिसरात असल्याची माहिती मिळली. यानंतर वापी येथे जाऊन एका हॉटेलमध्ये छापा टाकून तरुणाची सुटका करण्यात आली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!