द केरळ स्टोरी चित्रपटाच्या यशाबद्दल तुला काय वाटतं? अदा शर्मा म्हणाली, शाहरुख खानसारखा…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशात द केरला स्टोरी या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटावर बंदी घातली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी या चित्रपटावर बंदी आणली.
या वादाचा कसलाच परिणाम या चित्रपटाच्या कमाईवर झालेला नाही. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तगडी कमाई करत आहे. चित्रपटाला मिळणाऱ्या उदंड प्रतिसादावर अदा शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.
ती म्हणाली, चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून मी खूप आनंदी आहे. मी चित्रपटात काम करत असताना शेवटचा चित्रपट म्हणूनच काम करत असते कारण परत संधी मिळेल का नाही हे माहित नसत.
एवढंच नाही तर चांगली संधी मिळण्यासाठी ‘ओम शांती ओम’ या चित्रपटामधील शाहरुख खानसारखा पुनर्जन्म घ्यावा लागेल का, असा विचार पूर्वी माझ्या मनात यायचा असं अभिनेत्री अदा शर्मा म्हणाली.
Views:
[jp_post_view]