नवीन आर्थिक वर्षात काय बदलणार? 1 एप्रिलपासून कुठे दिलासा कुठे खर्च वाढणार, जाणून घ्या मोठे बदल…

मुंबई : आजपासून एक एप्रिल सुरू झाला आहे. म्हणजेच नवीन अर्थीक वर्षाला आजपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये काय काय बदल असणार याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. आजपासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. प्रत्येक महिना विशेषतः महिन्याचा पहिला दिवस अनेक मोठ्या बदलांसह सुरु होतो.
त्यामुळे आता आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच तुमच्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीपासून ते तुमच्या बँक खात्याशी संबंधित महत्त्वाचे बदल होणार आहे. ज्यामुळे एकीकडे दिलासा तर दुसरीकडे सर्वसामान्यांचा खिसा कापला जाईल. हे नेमके बदल काय? याबाबत सविस्तर माहिती समोर आली आहे.
यामध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) १ एप्रिल २०२५ पासून बऱ्याच काळापासून निष्क्रिय असलेल्या मोबाईल बँकांचे UPI व्यवहार थांबवणार आहे. म्हणजेच, जर तुमच्या बँक खात्याशी जुना नंबर लिंक असेल, जो बराच काळ बंद असल्यास UPI व्यवहार सुरू ठेवण्यासाठी वापरकर्त्यांना १ एप्रिल २०२५ आधी बँक खात्याशी एक नवीन नंबर लिंक करणे अनिवार्य होते.
तसेच एफडी, RD आणि इतर तत्सम बचत योजनांवरील एक लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर टीडीएस कापणार नाहीत. पण हा फायदा फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी जाहीर करण्यात आला आहे. त्याचवेळी, इतर गुंतवणूकदारांनाही दिलासा देण्यात आला असून त्यांच्यासाठी ही मर्यादा ४० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये करण्यात आली आहे.
आता ज्येष्ठ नागरिकाला एका वर्षात एफडीवर एक लाखांपर्यंत व्याज मिळाले तर त्यावर कोणताही टीडीएस कापला जाणार नाही. तसेच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेची MPC बैठक पार पडणार आहे. यामध्ये आरबीआयने सलग दुसऱ्यांदा व्याजदर कपातीची घोषणा अपेक्षित आहे. अशाप्रकारे, आरबीआयने रेपो रेट कमी केल्यास कर्जदारांचा होम आणि कर कर्जाचा ईएमआय कमी होईल आणि जास्तीत जास्त बचत होईल.