वैष्णवांचे महावितरणकडून स्वागत; अल्पोपाहाराची सेवा
पुणे : जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील दिंडींचे सोमवारी (ता. १२) सकाळी ९ वाजता नाशिकफाटा येथे आगमन झाले. यावेळी महावितरणच्या वतीने पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार तसेच वरिष्ठ अभियंता व कर्मचाऱ्यांनी वैष्णवांचे स्वागत केले.
कात्रज डेअरीचा अध्यक्ष ठरला! अजितदादांची पसंती भगवान पासलकरांना..
महावितरणच्या वतीने नाशिक फाटा येथे पालखी सोहळ्यातील वैष्णवांच्या स्वागतासाठी पूर्वतयारी करण्यात आली होती. मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता संजीव राठोड, कार्यकारी अभियंता दत्तात्रेय साळी व उदय भोसले यांच्यासह अभियंता व जनमित्रांनी वैष्णवांचे स्वागत केले.
पाकिस्तानमध्ये बिपरजॉय चक्रीवादळाचा हाहाकार, ३४ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता..
यावेळी महावितरणकडून चिवडा व बुंदीचे २० हजार पाकिटे वितरीत करून वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. यानंतर मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिडींत वारकरी म्हणून नाशिक फाटा ते दापोडीपर्यंत सहभाग घेतला.
मोठी बातमी! व्यावसायिकांना लाच मागणारा गवळी निघाला सत्तारांचा स्वीय सहायक, कृषिमंत्री अडचणीत..
दरम्यान जगदगुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा पुणे परिमंडल अंतर्गत पालखी सोहळा मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणी सुमारे १५० अभियंता व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तरुणांना मोठी संधी! पुणे महापालिकेअंतर्गत ५८१ पदांसाठी भरती, जाणून घ्या..
सुरळीत वीजपुरवठ्यासह वीज सुरक्षेसाठी उपाययोजना करीत दिडींतील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, फळे, अल्पोपाहार आदींची महावितरणकडून सेवा देण्यात येत आहे