Weather Update : पुण्यात पावसाचा जोर ओसरला? जाणून घ्या कसे असेल वातावरण, थंडीही वाढणार…


Weather Update : आजपासून पावसाचा जोर कमी होईल. त्यामुळे राज्यातील ढगाळ हवामान कमी होणार असून कोरडे वातावरण निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे किमान तापमान चार ते पाच अंश सेल्सिअसने कमी होण्याचा अंदाज आहे.

आजपासून गुरुवार (ता.११) पावसाचा जोर कमी होईल. त्यामुळे राज्यातील ढगाळ हवामान कमी होणार असून कोरडे वातावरण निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे किमान तापमान चार ते पाच अंश सेल्सिअसने कमी होण्याचा अंदाज आहे.

प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारवा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर पुणे शहरात ढगाळ वातावरणामुळे कमी झालेला गारठा या आठवड्यात पुन्हा येईल, असा अंदाज हवामान विभागाने बुधवारी व्यक्त केला. Weather Update

तसेच, पुण्यात बुधवारी सकाळी साडेआठपर्यंत किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ५.४ अंश सेल्सिअसने वाढून १६.४ अंश सेल्सिअस नोंदला गेला. तर कमाल तापमानाचा पारा ढगाळ वातावरणामुळे ३.१ अंश सेल्सिअस कमी होऊन २५.९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरला.

शहरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावल्याने वातावरणातील आर्द्रता वाढली. त्यामुळे भर दिवसा पुणेकरांना हुडहुडी भरली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!