Weather Update : राज्यात परतीच्या पावसात आता पावसाची विश्रांती!! जाणून घ्या राज्याची संपूर्ण परिस्थिती….


Weather Update : राज्यात परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने दणका दिला आहे. त्यामुळे परतीचा पाऊस चांगलाच धुमाकूळ घालणार अशी चिन्हे दिसत होती, मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे.

तसेच परतीच्या पावसाचा जोर ओसरल्यामुळे उन्हाचाही चटका जाणवू लागला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.राज्यात कमाल तापमानात वाढ झाली असून ‘ऑक्टोबर हीट’ जाणवू लागली आहे. ता

पमानाचा पारा ३६ अंशांच्याही पुढे गेला आहे. आज (ता. ४) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचं अंदाज वर्तवण्यात आला आहे. Weather Update

पुणे, सातारा, नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, सध्या राज्यभरात पावसाने उसंत घेतल्याने उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तापमानात वाढ होणार असून नागरिकांना ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!