गटशेतीचे नवे धोरण आणून आर्थिक मदत वाढवू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती..


मुंबई : गट शेतीचे नावे धोरण आणणार असून अनुदान ही वाढवून देणार असल्याची महत्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच गट शेतीला राज्य शासनाच्या वतीने १०० एकर जमीन असेल तर एक कोटी रुपये अनुदान देण्यात येत होते.

सत्यमेव जयते शेतकरी चषक २०२४’च्या भव्य पारितोषिक वितरण समारंभात देवेंद्र फडणवीस बोलत होते. पाणी फाउंडेशन च्या वतीने बालेवाडी येथील शिवछत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २०१६ पासून दुष्काळमुक्त आणि समृद्ध महाराष्ट्र बनविण्यासाठी अभिनेता अमीर खान आणि किरण राव यांनी ही संस्था स्थापन केली.

यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा आणि पद्मश्री पोपटराव पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच मनोरंजन व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील ४६ तालुक्यांतील ४,३०० पेक्षा अधिक शेतकरी गटांनी (सुमारे २००० महिला गट) यंदाच्या शेतकरी चषक स्पर्धेत भाग घेतला. यात सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील तेरती या गावातील ‘भाग्योदय शेतकरी गट’ संघाने राज्य पातळीवरील प्रथम पारितोषिक पटकवले.

दरम्यान, २५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक, तसेच प्रतिष्ठेची शेतकरी चषक ट्रॉफी जिंकली. सातारा जिल्ह्यातील भोसरे (ता. खटाव) येथील सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोबलगाव (ता. खुलताबाद) या दोन संघांना संयुक्तरीत्या १५ लाख रुपयांचे राज् पातळीवरील द्वितीय पारितोषिक देण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यातील कवडा (ता. कळमनुरी) येथील जय बिरसा मुंडा शेतकरी गट आणि वाशिम जिल्ह्यातील नागी (ता. मंगरूळ पीर) येथील माऊली शेतकरी गटाने संयुक्तरीत्या १० लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक जिंकले.सर्व महिला गटांना दोन राज्यस्तरीय पारितोषिके आणि तालुकास्तरीय प्रत्येकी ५० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!