वॉशिंग मशिनची कशी करावी स्वच्छता…!


 

 

उरुळी कांचन : घरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची काळजी घेतली नाही तर ते सुरळीत चालणार नाही. म्हणूनच त्यांची वेळच्या वेळी साफसफाई करणं आवश्यक आहे. कित्येक घरांमध्ये वॉशिंग मशिनचा नियमित वापर होतो. वॉशिंग मशिन सध्या घरातील अतिशय गरजेची वस्तू झाली आहे. मात्र या गरजेच्या वस्तूची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तरच ती आपल्याला उपयोगी पडू शकेल. वॉशिंग मशिनची नेमकी स्वच्छता कशी करावी याबाबत काही महत्वाच्या टिप्स.

खोलवर स्वच्छता

तुम्हाला असं वाटतं का की तुमचे कपडे स्वच्छ निघत नाहीत किंवा तुमच्या मशिनमधून कुबट वास येत आहे. असं असेल तर तुमच्या मशिनची स्वच्छता करण्याची वेळ आली आहे हे समजा. कधी कधी मशिनच्या आत लाल रंगाचे कण दिसतात. ते दिसायला लागले की स्वच्छता करण्याची गरज आहे हे समजावं. दोन कप लिंबाचा रस गरम पाण्यात घालून मशिन फिरवलं की ते स्वच्छ होईल पण यापैकी काहीही न दिसल्यास मशिनचा टब बदलायला झाला आहे असं समजावं.

ड्रायरची काळजी

 

ऑटोमॅटिक मशिन असेल तर त्यात बिल्ट ड्रायर असतो. प्रत्येक धुलाईनंतर त्यातलं लिंट काढून टाकावं, म्हणजे ड्रायरचं झाकण उघडं ठेवा. प्रत्येक वेळी कपडे धुऊन झाले की मशिनचं दार थोडा वेळ उघडं ठेवावं. म्हणजे आतील मॉइश्वर निघून जाईल. तसंच धुतल्यानंतरचा साबणाचा किंवा कपड्यांचा वासही निघून जाईल.

वायरवर लक्ष ठेवा :

वॉशिंग मशिनच्या वायर दुमडणार नाही याकडे लक्ष द्या. म्हणजे त्या थोडाशा वाकलेल्या दिसल्यास त्या त्वरित बदलायला झाल्या आहेत हे समजावं. खरं म्हणजे दर पाच वर्षांनी वायर किंवा पाईप यासारख्या अॅक्सेसरीज बदलाव्यात.

मशिनमध्ये सांडलेलं पुसून घ्या :

तुमच्याकडून मशिनवर किंवा मशिनमध्ये काहीही सांडल्यास ते लगेचच ओल्या कपड्याने पुसून घ्यावं. ते जास्त दिवस ठेवू नये म्हणजे त्यावर डाग पडणार नाही. अगदी सहज पुसले जाईल. कारण ते कोणत्याही सोल्युशनने पुसल्यास खराब होईल.

झाकणाचा वापर करताना 

तुम्ही तुमच्या मशिनचा वरचा भाग कामासाठी वापरत असला तर त्यावर काम करण्यापूर्वी प्रथम टॉवेल ठेवा. एखादा डाग काढण्यासाठी तुम्ही जेव्हा वरच्या भागाचा वापर करतात तेव्हा ही युक्ती उपयुक्त ठरते. कारण डाग काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सोल्युशनमुळेही हा भाग खराब होऊ शकतो. कात्रीसारख्या वस्तू याच्यापासून लांबच ठेवा. त्यामुळे त्या झाकणावर ओरखडे उमटू शकतात. कंट्रोल पॅनलपासून लिक्विड लांबच ठेवा. नाहीतर त्यामुळे ते कंट्रोल पॅनल खराब होऊ शकतं.

अंतर्बाह्य स्वच्छ करा

साबणाचे कण पडल्यानेदेखील हे मशिन चिकट होऊ शकतं. म्हणूनच मशिन नियमित आतून आणि बाहेरून आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ पुसून घ्यावं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!