पाणीपुरीचे पैसे मागितल्याने पाणीपुरी चालकावर चाकूने वार…!
पुणे : पाणी पुरी खाल्ल्यानंतर पैसे मागितल्याने दोघा गुंडाने पाणीपुरी चालकावर चाकूने हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारवाड्यासमोरील पाणीपुरी स्टॉलवर शनिवारी रात्री पावणे आठ वाजता घडली आहे.
याप्रकरणी राजेंद्रसिंग दयाराम जाठम (वय २२, रा. मंगळवार पेठ) असे फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद व्यक्तीचे नाव आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा शिवाजी रोडवर शनिवारवाड्यासमोर पाणीपुरीचा स्टॉल आहे. शनिवारी रात्री रिक्षातून दोघे जण अचानक आले. त्यानंतर फिर्यादी राजेंद्रसिंग जाठम याला पाणी पुरी खिला, तू अपने भाई को बुला असे म्हणाले. फिर्यादी यांनी त्यांना पाणीपुरी खाण्यास दिली
त्यानंतर फिर्यादी राजेंद्रसिंग जाठम यांनी त्यांना पाणीपुरीचे पैसे मागितले असता त्यांचा राग येऊन त्यांनी खिशातून चाकू काढला. फिर्यादी यांच्या कोपर्यावर व दंडावर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. दुसर्याने त्यांना हाताने मारहाण केली. याप्रकणी राजेंद्रसिंग जाठम यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.त्यानुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.