Wai : हॉटेलमध्ये नाष्टा करता करता ३ लाख विसरले, मालकाने प्रामाणिकपणा दाखवला अन् पैसे परत मिळाले, मालकाच्या कृतीचे होतंय कौतुक…

Wai : अनेकदा आपण मौल्यवान वस्तू तसेच पैसे विसरतो. यामुळे आपलं नुकसान होतं. आता वेळे ता. वाई येथील असलेले नितीन डेरे यांचं वेळे येथे हॉटेल विशाल नावाने हॉटेल आहे. याठिकाणी नाश्ता करण्यासा एक व्यापारी ग्राहक आले. यावेळी नाष्टा करून टेबलवर ठेवलेली बॅग ते विसरले.
यावेळी त्या बॅगेत तीन लाख रुपये होते. नितीन डेरेंच्याच हाती ही बॅग लागली आणि मूळ मालकाला ती विश्वासाने परत केली गेली. दिनेश देसाई हे पुण्यावरून रत्नागिरीला जात असताना हॉटेल विशाल येथे नाश्त्यासाठी थांबले होते व नाश्ता झाल्यानंतर त्यांच्या जवळ रोख रक्कम 3 लाख रुपये असलेली बॅग ते हॉटेल मध्येच विसरून गेले.
ते प्रवास करताना कराड येथे पोहोचल्यावर आपल्या सोबत असणारी पैशाची बॅग हॉटेल मध्येच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. हॉटेल मालक नितीन डेरे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ती उघडून न पाहता ताब्यात घेऊन स्वत:च्या लॉकरमध्येच सुरक्षित ठेवली होती.
काही तासातच आंबा व्यापारी देसाई हे घाईघाईने कराडहून परत वेळे येथील विशाल हॉटेल मध्ये आले. त्यांनी हॉटेलमध्ये विचारणा केली त्यावर नितीन डेरे यांनी बॅग आपल्याकडे सुरक्षित असल्याचे सांगितले परंतु त्यांची शहानिशा केली आणि नितीन डेरे यांनी ही बॅग देसाई यांना परत केली. Wai
बॅग परत केल्यानंतर देसाई यांनी यामध्ये रोख रक्कम 3 लाख रुपये आहेत असे सांगितले. यामुळे नितीन डेरे यांचा हा प्रामाणिकपणा पाहून आंबा व्यापारी देसाई यांनी त्यांचे कौतुक केले व आभार मानले. यामुळे देसाई त्यांना रोख रक्कम बक्षीस देऊ करत होते परंतु नितीन शेठ यांनी त्यांना नकार दिला.